मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर्समध्ये गुंतवणुकीचा कल वाढला असून, आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात 38,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला, एफपीआयने शेअर्समध्ये 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारीमध्ये 25,743 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. एकूणच, या वर्षात आतापर्यंत, एफपीआयने भारतीय शेअर बाजारात 13,893 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारीच्या सुरुवातीला एफपीआयने शेअर्समध्ये 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारीमध्ये त्यांनी 25,743 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. एकूणच, या वर्षात आतापर्यंत, एफपीआयने भारतीय शेअर बाजारात 13,893 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मार्चमध्ये लक्षणीय खरेदी या काळात त्यांनी कर्ज किंवा रोखे बाजारात 55,480 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
एफपीआय मार्चमध्ये लक्षणीय खरेदी करत आहेत. जागतिक आर्थिक आघाडीतील सुधारणा आणि भारताच्या सकारात्मक स्थूल आर्थिक दृष्टिकोनामुळे, एफपीआय भारतासारख्या उच्च वाढीच्या बाजारपेठेकडे वाटचाल करत आहेत. याशिवाय बाजारातील नुकत्याच झालेल्या सुधारणांमुळे त्यांना गुंतवणूक करण्याची संधीही मिळाली आहे. त्यात आता परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूदारांनी मार्चमध्ये आत्तापर्यंत 38,000 कोटींची गुंतवणूक केली आहे.