मुंबई : टाटा समूहाची आयटी कंपनी अशी ओळख असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) च्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. टीसीएसच्या आर्थिक वर्ष 2024 च्या एप्रिल-जून तिमाहीच्या आर्थिक निकालांसह भागधारकांसाठी अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. टीसीएसचा निव्वळ नफा मागील वर्षी याच कालावधीत 11,074 कोटी इतका होता. आता हा नफा 12,040 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीच्या तुलनेत, निव्वळ नफ्यात 3.1 टक्क्यांनी घट झाली आहे. जून तिमाहीत टीसीएसचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 8.72 टक्क्यांनी वाढून 12,040 कोटी रुपयांवर गेला. तर महसूल 5.44 टक्क्यांनी वाढून 62,613 कोटी रुपयांवर पोहोचला. मार्च 2024 च्या तिमाहीत टीसीएसला 12,434 कोटी रुपयांचा नफा आणि 61,237 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
गुरुवारी एप्रिल-जून 2014 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले. या समीक्षाधीन (Under Review) कालावधीत तिचा महसूल 5.4 टक्क्यांनी वाढून 62,613 कोटी रुपये झाला आहे. त्यातच टीसीएसचे शेअर्स 11 जुलै रोजी बीएसईवर 0.33 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 3922.70 रुपयांवर बंद झाले.