नवी दिल्ली : व्यवसाय म्हटलं की नफा-तोटा या गोष्टी आल्याच. कधी कोणाला जास्त फायदा होतो तर कधी त्याच व्यावसायिकाला मोठा तोटाही सहन करावा लागतो. हेच व्यवसायाचे चित्र सध्या सगळीकडे आहे. असे असताना अशी एक कंपनी आहे जी सुरुवातीला चांगली फायद्यात राहिली. पण नंतर मोठा तोटा झाल्याने कंपनीला फटका बसला.
एज्युटेक कंपनी बायजू असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटात होती. इतकेच नाहीतर कंपनीकडे आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील पैसे नव्हते. सध्या या कंपनीचे नेटवर्थ शून्य झाले आहे. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी या कंपनीबद्दल सर्व माहिती दिली. रवींद्रन यांनी सांगितले की, बायजूच्या तीन प्रमुख गुंतवणूकदारांनी राजीनामा दिल्याने फंड उभारणे अवघड झाले.
Prosus सारख्या गुंतवणूकदारांनी एकेकाळी सर्वोच्च मूल्यमापन असलेल्या भारतीय स्टार्टअपमधील त्यांची गुंतवणूक संपवली. बायजू कंपनीबाबत कोणतीही फसवणूक झालेली नाही. असे काही केले असते तर रवींद्रन यांनी सर्वप्रथम कंपनीचे पैसे काढले असते, परंतु आम्ही असे केले नाही, उलट आम्ही अधिक पैसे गुंतवल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.