नवी दिल्ली : चांगल्या परताव्यासाठी विविध माध्यमांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यात सोने खरेदी असो की शेअर मार्केट किंवा बँका यामध्ये ही गुंतवणूक होत असते. पण काहीजण सोने किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास संकोच करतात, अशा लोकांसाठी बँक हा पर्याय असू शकतो. कारण, बँकांमधील ठेवी या सुरक्षित मानल्या जातात.
बँकांमध्ये ठेवलेली रक्कम ही सुरक्षित मानली जातेच. शिवाय त्यातून मिळणारे व्याजही चांगले असते. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ही 5 वर्षांच्या कालावधीसह FD वर 6.5% व्याज देते. त्याच वेळी, एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.8% व्याजदर आहे. हे दर 15 मे 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.
तसेच खाजगी क्षेत्रातील नावाजलेली बँक अशी ओळख असलेल्या एचडीएफसी या बँकेतही चांगला रिटर्न मिळतोय. HDFC बँक पाच वर्षांसाठी FD वर 7% व्याज देते. परंतु जर तुम्ही एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD चा विचार करत असाल तर ते 6.6% आहे. हे दर 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.
याशिवाय, बँक ऑफ बडोदा (BOB) पाच वर्षांच्या FD वर 6.50% वार्षिक व्याज देत आहे. 15 जानेवारी 2024 पासून लागू झालेल्या व्याजदरानुसार, एका वर्षाच्या FD वर वार्षिक 6.85 टक्के व्याज मिळत आहे.