नवी दिल्ली : सध्या रशिया-युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. त्यानंतर आता इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशांत युद्धाची सुरुवात झाली आहे. मात्र, हे युद्ध जर भडकलं तर याचा भारतावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. टाटा ते अदानीपर्यंतच्या अनेक व्यवसायावर परिणाम होणार आहे.
युद्धाचे परिणाम दोन्ही देशांमध्ये आधीच दिसून येत आहेत आणि अमेरिकेपासून भारतापर्यंतचे शेअर बाजार ही त्याची उदाहरणे आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत घबराट पसरली आहे. गुरुवारी सेन्सेक्स 1769 अंकांनी आणि निफ्टी 546 अंकांनी घसरला, तर शुक्रवारी बाजार लवकर कोसळला.
या युद्धाच्या व्याप्तीत सुमारे 14 भारतीय कंपन्या आहेत, ज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये टाटा समूहातील कंपन्यांपासून ते गौतम अदानीपर्यंतच्या कंपन्यांचा समावेश आहे. युद्धाचा फटका या कंपन्यांच्या शेअर्सवर पडू लागला आहे.
टाटा कंपनीचे नाव सर्वात पुढे
इस्रायलमध्ये व्यवसाय करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या यादीतील पुढचे मोठे नाव टाटा समूहाचे आहे. ज्यांचा व्यवसाय ज्वेलरी क्षेत्रापासून ते आयटी क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्ध वाढले तर टायटन आणि टीसीएसच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.