नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात आघाडीची बँक अशी ओळख असलेल्या एचडीएफसी बँकेचे नाव जगभरात उंचावले आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस 17 टक्क्यांनी वाढले आहे. इतकेच नाही तर बँकेच्या मार्केट कॅपमध्ये 154.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे.
एचडीएफसी बँकेसोबतच भारतातील आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँका देखील जागतिक बँकांना टक्कर देत आहेत. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वाधिक कर्ज वाटणाऱ्या बँका ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही बँकांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या जून महिन्याच्या अखेरीस वाढ नोंदवली गेली आहे.
त्यात आता काही दिवसांपूर्वी अधिकच्या नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्समुळे (एनपीए) त्रस्त असलेल्या भारतीय बँका सध्या जगभरातील बँकांना टक्कर देत आहे. ज्यामुळे एचडीएफसी बँकेचा आता जगातील टॉप 10 बँकांमध्ये समावेश झाला आहे. तसेच देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचे मार्केट कॅप देखील 11.9 टक्क्यांनी वाढून 90.1 अब्ज डॉलर झाले आहे.