मुंबई : सध्या गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यात बँका असो किंवा शेअर मार्केट किंवा LIC. हे योग्य पर्याय दिसून येत आहेत. LIC मध्ये सर्वच वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी उपलब्ध करून देण्यात आली. LIC ची जीवन आनंद पॉलिसी एक योग्य आणि उत्तम अशी दिसून येते. ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 45 रुपये वाचवून 25 लाख रुपये मिळवू शकता.
जर तुम्हाला कमी प्रीमियममध्ये स्वत:साठी जास्त पैसा हवा असल्यास जीवन आनंद पॉलिसी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एकप्रकारे ते टर्म पॉलिसीसारखे आहे. जोपर्यंत तुमची पॉलिसी लागू आहे तोपर्यंत तुम्ही प्रीमियम भरू शकता. या योजनेत, पॉलिसीधारकाला फक्त एक नाही तर अनेक मॅच्युरिटी लाभ मिळतात. LIC च्या या योजनेत, किमान 1 लाख रुपयांची खात्री आहे, तर कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये, तुम्ही दरमहा सुमारे 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवू शकता. जर आपण दररोज पाहिले तर आपल्याला दररोज 45 रुपये वाचवावे लागतील. तुम्हाला ही बचत दीर्घ मुदतीसाठी करावी लागेल.
दरम्यान, या पॉलिसीअंतर्गत, जर तुम्ही दररोज 45 रुपये वाचवले आणि 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर या योजनेची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतील. जर आपण वार्षिक आधारावर बचत केलेली रक्कम पाहिली तर ती सुमारे 16,300 रुपये असेल.