नवी दिल्ली : एका दिवसाच्या ब्रेकनंतर सोमवारी शेअर बाजाराने पुन्हा नवा उच्चांक गाठला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सेन्सेक्स 443.46 (0.56%) अंकांच्या वाढीसह 79,476.19 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 131.36 (0.55%) अंकांनी वाढून 24,141.95 वर बंद झाला.
शेअर बाजारात एका दिवसाच्या घसरणीनंतर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी पुन्हा खरेदी दिसून आली. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 210.45 (0.26%) अंकांच्या घसरणीसह 79,032.73 वर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी 33.91 (0.14%) अंकांनी घसरून 24,010.60 वर बंद झाला. भारती एअरटेल आणि कोटक बँकेच्या शेअर्समध्ये प्रत्येकी दोन टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
जागतिक बाजारातील मजबूतीमुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात बँक आणि आयटी समभागांमध्ये खरेदी दिसून आली. एनएसई निर्देशांक निफ्टी 131.35 अंकांनी वधारला आणि 24,141.95 अंकांवर बंद झाला.