नवी दिल्ली : सध्या क्रिप्टो करन्सीचा वापर वाढत आहे. नोंदणीकृत नसलेल्या क्रिप्टो करन्सीचा वापर लक्षात घेता भारत सरकारने सुरुवातीपासूनच क्रिप्टोकरन्सीबाबत कडक भूमिका घेतली आहे. त्यात आता अर्थ मंत्रालयाने 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत नोटिस बजावली आहे.
भारताच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने या सर्व 9 विदेशी क्रिप्टो कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. Bi- nance, KuCoin, Huobi, Kraken, Get.io, Bittrex, Bit- stamp, MEXC Global आणि Bitfinex या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. क्रिप्टो कंपन्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये कोणतीही टाईमलाईन दिलेली नाही. याचा अर्थ कंपन्यांना कधी उत्तर द्यावे लागेल किंवा त्यांच्यावर कधी कारवाई केली जाईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
भारतातील क्रिप्टो कंपन्यांवर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे. 28 देशांतर्गत क्रिप्टो कंपन्यांनी फायनान्शियल इंटेलिजेंस युनिटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे. आता अशा कंपन्यांची संख्या 31 झाली आहे. असे असताना नऊ विदेशी क्रिप्टो कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आली आहे.