नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जनतेला मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते. पेट्रोलियम मंत्रालय पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे. किमतीतील कपातीचा काही भाग ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCs) येईल. किमती कमी करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे वेगवेगळे पर्याय तयार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला वेगवेगळे मसुदे पाठवले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर केवळ पंतप्रधानांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींबाबत बोलायचे झाले तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति डॉलर 78.71 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील त्यांच्या किमती मुळात आंतरराष्ट्रीय किमतींवरही अवलंबून असतात. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरही मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क आकारले जाते. तसेच, राज्य सरकारे त्यांच्या किमतींवर व्हॅट लावतात.
पेट्रोल आणि डिझेलची सध्याची किंमत किती ?
देशाची राजधानी दिल्लीत सध्या एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 पैसे आहे. तर राजस्थानमध्ये ते 109.34 रुपयांना उपलब्ध आहे. एक लिटर पेट्रोल हरियाणामध्ये 97.31 रुपये, यूपीमध्ये 97.05 रुपये आणि पंजाबमध्ये 98.45 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचे झाले तर ते दिल्लीत 89.62 रुपये प्रति लिटर, यूपीमध्ये 90.16 रुपये, पंजाबमध्ये 88.57 रुपये आणि हरियाणामध्ये 90.16 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्यास जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.