नवी दिल्ली : धनत्रयोदशी दोनच दिवसांत साजरी केली जाणार आहे. त्यात सोन्याच्या भावात किंचितशी घट झाली आहे. यापूर्वी याच किमती गगनाला भिडले होत्या. नवे उच्चांकही गाठले होते. मात्र, आता सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीचा भावही किलोमागे एक लाख रुपयांच्या खाली आला आहे.
सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. MCX आणि सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत फरक जाणवत आहे. मल्टी कमोडिटी मार्केट, ज्याला फ्युचर्स मार्केट देखील म्हणतात. येथे 5 डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी सोन्याचा भाव 287 रुपयांनी घसरून 78040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर शुक्रवारी दिवसभराच्या व्यवहारात 400 रुपयांनी घट झाली होती.
10 ग्रॅम सोन्याचा दर 78919 रुपये झाला होता. अशा परिस्थितीत, ते आतापर्यंतच्या उच्च पातळीपासून प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी 3700 रुपयांनी स्वस्त झाली आहे. शुक्रवारी वायदा बाजारात 1 किलो चांदीचा भाव 96500 रुपये होता, जो 535 रुपयांनी स्वस्त झाला. मात्र, दिवसभराच्या व्यवहारात किलोमागे 1200 रुपयांनी घट झाली.