नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. जागतिक बाजारातील मजबूत संकेत आणि देशांतर्गत मागणी वाढल्याने मंगळवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढून 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’नुसार, मंगळवारी चांदीचा भाव 83,500 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला. 99.5 टक्के शुद्धतेचे सोनेही मागील व्यापार सत्रातील बंदच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढून 72,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. किरकोळ खरेदीदार तसेच ज्वेलर्सकडून वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या सत्रात म्हणजेच सोमवारी 99.9 टक्के शुद्धतेसह मौल्यवान धातू 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
दरम्यान, पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 70,420 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढल्याचे दिसत आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 65,180 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 82,200 रुपयांवर गेले आहेत.