पुणे : सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती, सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. सोन्याच्या किमतीत झालेली ही वाढ पाहून अनेकांनी यामध्ये गुंतवणूकही केली होती. मात्र, आता याच सोने-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे.
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे, जे लवकर पैसे मिळवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करत होते. गेल्या 15-20 दिवसांत सोन्याचा भाव वाढण्याऐवजी घसरला आहे. या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरणीचा कल कायम आहे. डिसेंबरमधील गेल्या 15 दिवसांची स्थिती पाहिली तर सोन्यामध्ये सातत्याने घसरण होत आहे. 1 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 77128 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आता 76362 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 76670 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 70960 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,300 रुपयांवर गेले आहेत.