सोने-चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. या आठवड्यात एखादी महागडी भेट तुम्हाला आवडत्या व्यक्तीला देता येईल. त्यातच आजपासून व्हॅलेंटाईन आठवड्याची सुरु झाला आहे आणि सोने-चांदीत पडझड पाहायला मिळाली आहे. जानेवारीमध्ये सोने 2200 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांनी घसरले होते. चला तर पाहूयात आजचे सोने-चांदीचे दर.
सोन्याच्या आता घसरण
गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोने 57,890 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 23 कॅरेट 62,229 रुपये, 18 कॅरेट 46,859 रुपये, 14 कॅरेट सोने 36,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 2023 मध्ये सोन्याने दरात उच्चांक गाठला होता. जानेवारीत भाव घसरले. फेब्रुवारीच्या सुरुवातील दरवाढ झाली. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले. तर 3 फेब्रुवारी रोजी किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली. 5 फेब्रुवारी रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 6 फेब्रुवारी रोजी भाव 220 रुपयांनी स्वस्त झाले.
चांदीत घसरण
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.