प्रजासत्ताक दिनी ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस आणि मध्यंतरी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीच्या किंमती वधारल्या आहेत. तर इतर दिवशी या मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी पडझड झाली. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली.
सोन्यात झाली घसरण
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जानेवारी महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाली. या महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. सोमवारपासून किंमतीत मोठा बदल दिसला नाही. 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसण झाली.
चांदी वधारली
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे. तर 24 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 25 जानेवारी रोजी चांदीची किंमत 700 रुपयांनी वाढली. या महिन्यात चांदीचा भाव बराच घसरला. ग्राहकांना चांदीने दिलासा दिला. 23 जानेवारी रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण आली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय?
सोने उतरले तर चांदीच्या दरात वाढ झाली. गुडरिटर्न्सच्या अहवालानुसार, 24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले. 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.