सोने-चांदीच्या दरात घसरण आजही पहायला मिळाली. गेल्या आठवड्याभरापासून दरात रोज काहीशा प्रमाणात घट होत आहे. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण झाली. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या जवळपास 15 दिवसांत सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी उतरली.
सोन्याचे दर
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांची पावले आपोआप सराफा बाजाराकडे वळली आहेत. या तीन दिवसांत सोने 750 रुपयांनी तर चांदी 1300 रुपयांनी उतरली. सोने 16 जानेवारीला 100 रुपयांनी, 17 जानेवारी रोजी 350 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. 19 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 330 रुपयांनी वाढला.
सोन्याचे दर
नवीन वर्षात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चांदी 1400 रुपयांनी महागली होती. तर त्यापूर्वी चांदीत 3100 रुपयांची घसरण झाली होती. 16 जानेवारी रोजी किंमती 300 रुपयांनी, 17 जानेवारीला 600 रुपयांनी तर 18 जानेवारी रोजी भावात 400 रुपयांची घसरण झाली. 19 जानेवारी रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये आहे.