Gold Silver Rate : नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमतींनी पुन्हा गगन भरारी घेतली. ऐन लग्नसराईत सोने-चांदीने ग्राहकांची नाराजी ओढावून घेतली आहे. पुढील वर्षात आता सोने आणि चांदी नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे. सोने आता 65,000 हजारांच्या घरात पोहचते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, एक किलो चांदीचा भाव 79,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
24 कॅरेट सोने 62,728 रुपये, 23 कॅरेट 62,477 रुपये, 22 कॅरेट सोने 57,458 रुपये झाले. 18 कॅरेट 47,046 रुपये, 14 कॅरेट सोने 36,695 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 76,400 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची भरारी
दिवाळीपासून दरवाढीचे सत्र सुरुच आहे. त्याला किंचित ब्रेक लागला. या आठवड्यात सोन्याने आतापर्यंतचे रेकॉर्डच मोडले नाही तर नवीन विक्रम पण केले. या आठवड्यात सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. 30 नोव्हेंबर रोजी भावात 650 रुपयांची घसरण झाली. तर 1 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
2300 रुपयांनी चांदी महाग
गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी महाग झाली. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली. 1 डिसेंबर रोजी 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,500 रुपये आहे.