सोने-चांदीच्या दरात दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. 22 कॅरेट सोन्याचा दर 5,780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6305 रुपये प्रति ग्रॅम आहे.
सोन्याचा आजचा दर काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार कायम आहेत. आज 22 जानेवारीला सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. शनिवारी बाजार बंद होताना सोन्याच्या दरात वाढ झाली. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,305 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,290 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 57,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रतितोळा आहे.
आज चांदीचा भाव काय?
आज चांदीचा भाव स्थिर आहे. कालच्या आणि आजच्या चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज एक किलो चांदीचा दर 75,500 रुपये प्रति किलो आहे. मात्र, शनिवारी एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये होता. त्यानंतर रविवारी चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आणि आज भाव स्थिर आहे.
प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर
मुंबईत सोन्याचा दर 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दिल्लीत सोनं 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईत आज सोन्याचा दर 63550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नाशकात 24 कॅरेट सोने 63,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नागपूरात 24 कॅरेट सोने 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोल्हापूरात 24 कॅरेट सोने 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.