सोने-चांदीने खरेदीदारांना आजही मोठा दिलासा दिला आहे. दागिन्यांच्या किंमतीत घसरण झाली आहे. 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान किंमती वधारल्या. या आठवड्यात दोन दिवसात भाव उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. डिसेंबर महिन्यात किंमतींनी उच्चांक गाठला होता. त्यापूर्वी सोने 1300 रुपयांनी आणि चांदी 3100 रुपयांनी घसरले होते. आजचा सोन्याचा भाव जाणून घेऊयात.
सोन्याच्या दरात चढउतार
वर्षाच्या सुरूवातील 3 ते 11 जानेवारीपर्यंत सोन्याचा भाव उतरला. 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची तर 13 जानेवारी रोजी 300 रुपयांची वाढ सोन्यामध्ये झाली. तर या आठवड्यात 15 जानेवारीला सोन्याच्या किंमती 150 रुपयांनी वाढल्या. 16 जानेवारीला 100 रुपयांनी भाव उतरले. तर 17 जानेवारी रोजी 350 रुपयांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचे दर घसरले
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपयांना आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांदीच्या दरांनी ग्राहकांना मोठे झटके दिले आहेत. 10 जानेवारीला चांदी 600 रुपयांनी महागली. 11-12 जानेवारी रोजी भाव स्थिर होते. 13 जानेवारीला 500 रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्यात 15 जानेवारीला 300 रुपयांची वाढ झाली. 16 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली.
गुडरिटरर्न्सनुसार, सोने आणि चांदीचे भाव उतरले आहेत. 24 कॅरेट सोने 62,277 रुपये, 23 कॅरेट 62,028 रुपये, 22 कॅरेट सोने 57,046 रुपये झाले. 18 कॅरेट 46,708 रुपये, 14 कॅरेट सोने 36,432 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,191 रुपये झाला आहे.