सोन्याने ग्राहकांना चांगला दिलासा दिला आहे. बजेटनंतर सोने अजून महागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, तसे काही झाले नाही. सोन्याने या आठवड्यात मोठा दिलासा दिला. सोने या आठवड्यात 600 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात एकदाच 180 रुपयांची दरवाढ झाली. चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,३३० रुपये आहे. तर, बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदीचा दर ७१,३६० रुपये प्रति किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०३५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२२० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,०३५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,२२० प्रति १० ग्रॅम आहे.नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०३५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२७० रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,०३५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,२२० रुपये इतका असेल.