नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. त्यातच आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. तर चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. राजधानी दिल्लीत सोने 100 रुपयांनी वाढून हा दर 74,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 87,200 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला.
देशांतर्गत बाजारपेठेतील स्थानिक ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी वाढल्याने सोन्याच्या वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून ट्रेडिंग सत्रात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. हा दर पूर्वी 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता यामध्ये वाढ झाली आहे.
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 71,880 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत काही प्रमाणात वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 66,530 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 86,300 रुपयांवर गेले आहेत.