नवी दिल्ली : सध्या सणासुदीचे दिवस सुरु होत आहे. त्यात सोने-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सोने 200 रुपयांनी वाढून 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. मंगळवारी हेच सोने 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर मिळत होते. पण, आता दरात वाढ झाली आहे.
गुरुवारी चांदीचा भावही 665 रुपयांनी वाढून 93,165 रुपये प्रतिकिलो झाला. मागील सत्रात हा दर 92,500 रुपये प्रति किलो होता. याशिवाय 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून 77,900 रुपये प्रति 10 ग्रॅम या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला आहे. मंगळवारी सोने 77,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद होते.
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 75,820 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 70,180 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 92,500 रुपयांवर गेले आहेत.