प्रॉपर्टी अर्थात संपत्ती. याच्यासाठी अनेक भांडणं, वाद झाल्याचे आपण ऐकले असेल. जर तुम्ही निवृत्त व्यक्ती असाल तर तुमच्या सर्व मालमत्तेच्या वितरणाबाबत माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या मालमत्तेवर अनेक दावेदार असू शकतात, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत, खटले आणि इतर वाद टाळण्यासाठी इच्छापत्र वेळीच तयार करा.
तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर किंवा निवृत्त झाल्यावर तुमची रिअल इस्टेट होल्डिंग कमी करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही निर्णय घेण्यास आणि तुमच्या प्रियजनांना किंवा ज्या संस्थांना तुम्ही सोपवू इच्छिता, त्या संस्थांना सोपवण्यास तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असाल तेव्हा इच्छापत्र तयार करा. तुमच्या निधनानंतर यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. कारण, तुम्ही जिवंत असताना तुमच्या मालमत्तेचे काय करायचे हे तुम्ही स्पष्टपणे ठरवलेले नसते.
निवृत्तीनंतर कमी गोंधळलेले आर्थिक जीवन जगण्याची मानसिकता ठेवा. म्युच्युअल फंड होल्डिंग कमी करा. तसेच स्टॉक होल्डिंग मर्यादित करा. हे सर्व असताना संपत्तीसाठी फक्त नॉमिनीच नाहीतर इच्छापत्राचीही गरज असते. त्याने पुढील वाद टाळता येऊ शकतो.