मुंबई : शेअर मार्केटमध्ये चढउतार कायम असल्याचे दिसत आहे. मंगळवारी सेन्सेक्स 105 अंकांच्या घसरणीसह 80,004 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीही 27 अंकांनी घसरून 24,194 च्या पातळीवर बंद झाला. तर बीएसई स्मॉलकॅप 333 अंकांच्या वाढीसह 53,923 वर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 स्टॉक्सपैकी 16 घसरले आणि 14 वाढले. 50 निफ्टी समभागांपैकी 27 घसरले आणि 23 वाढले. NSE च्या ऑटो सेक्टरमध्ये 1.28 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांनी 9,947.55 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केल्याचेही आज दिसून आले. लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मास्युटिकल आणि अल्ट्राटेक सिमेंट यांनी बाजारात आघाडी घेतली. तर इन्फोसिस, रिलायन्स, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकेने बाजार उंचावला.
दरम्यान, सोमवारी सेन्सेक्स 992 अंकांच्या वाढीसह 80,109 च्या पातळीवर बंद झाला होता. निफ्टीमध्येही 314 अंकांची वाढ होऊन तो 24,221 च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी बीएसई स्मॉलकॅप 976 अंकांनी वाढून 53,589 च्या पातळीवर बंद झाला.