नवी दिल्ली : भारताने निर्यात क्षेत्रात एप्रिल-मे महिन्यात मोठी झेप घेतली आहे. या काळात भारताच्या निर्यातीत पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, ‘जागतिक आव्हानांमध्ये भारताच्या निर्यातीत चांगली वाढ झाली आहे. एप्रिल-मेनंतर जूनमध्येही निर्यातीची आकडेवारी सकारात्मक आहे. सेवा क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे’.
मे नंतर जूनचे आकडे फार चांगले आहेत. एकूणच पहिल्या तिमाहीत निर्यात चांगली झाली आहे. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास युद्ध, लाल समुद्रातील संकट आणि कंटेनरचा तुटवडा यामुळे भारताची निर्यात सकारात्मक असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. वाणिज्य मंत्रालय जून महिन्यातील निर्यातीची अधिकृत आकडेवारी 15 जुलै रोजी जाहीर करेल, असेही सांगण्यात आले.
गोयल म्हणाले की, भारताच्या व्यावसायिक निर्यातीत मे महिन्यात 9.1 टक्क्यांनी वाढ झाली आणि ती US$ 38.13 अब्ज झाली. चालू आर्थिक वर्षात, एप्रिल-मे मध्ये, आउटबाउंड शिपमेंट 5.1 टक्क्यांनी वाढून $73.12 अब्ज झाली आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीची स्थिती सुधारेल तेव्हा त्यातही वाढ होईल. मात्र, भारतात सातत्याने थेट परकीय गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.