मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत होती. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’नुसार, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 432 रुपयांनी घसरून 76,308 रुपयांवर आला आहे. यापूर्वी सोन्याचा भाव 76,740 रुपये प्रति दहा ग्रॅम होता.
चांदीच्या दरातही आज घसरण झाल्याचे पाहिला मिळाले. हा दर 772 रुपयांनी घसरून 88,611 रुपये किलो झाला. यापूर्वी चांदीचा भाव 89,383 रुपये होता. त्याच वेळी, 23 ऑक्टोबर रोजी चांदीने 99,151 रुपये आणि 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने 79,681 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,900 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77,350 रुपये झाला आहे.
तर कोलकाता येथे 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,900 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 77,350 रुपये झाली. पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 76,170 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 70,540 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,100 रुपयांवर गेले आहेत.