मुंबई : भारतीय शेअर बाजारामध्ये या आठवड्यात बंपर वाढ झाली आहे. शेअर बाजारात सतत वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांची चांगली खरेदी दिसून येत आहे. अशा स्थितीत बाजार तेजीसह सुरू होऊ शकतो, असाही अंदाज आहे.
तज्ज्ञांच्या मते, निफ्टी निर्देशांकात जोरदार वाढ दिसून आली आहे. 21,800 चा टप्पा पार केला असून, त्यामुळे येत्या काळात निफ्टीमध्ये 22 हजार आणि 22 हजार 200 चे संभाव्य लक्ष्य दिसू शकते. निफ्टीमधील हा ब्रेकआऊट तेजीचे संकेत देत आहे. निफ्टीला खालचा आधार 21,700 च्या जवळ दिसत आहे. त्यात आयटी शेअर्समध्ये बंपर खरेदी होताना दिसत आहे.
म्युच्युअल फंडातील सततच्या गुंतवणुकीमुळेही बाजाराला पाठिंबा मिळत आहे. डिसेंबर तिमाहीचे निकाल शेअर बाजाराची भविष्यातील वाटचाल ठरवण्यात मोठी भूमिका बजावतील. आगामी काळात बाजार वाढू शकतो. गुंतवणूकदार घसरणीवर खरेदीच्या संधी शोधू शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.