मुंबई : सध्याच्या 2024 यावर्षी भारतीय IPO बाजारात मोठी घडामोड पाहिला मिळाली. TATA ते Hyundai सारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांचे IPO लाँच केले आहेत. त्यात एनर्जी कंपनीच्या IPO ने एका रेकॉर्ड मोडला आहे. ऊर्जा कंपनी Waaree Energies च्या IPO ने ही कामगिरी केली आहे.
Waaree Energies ने टाटा आणि बजाज यांसारख्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. या IPO ला आत्तापर्यंत इतर कोणत्याही IPO पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यांनी एक विक्रम केला आहे. सौर मॉड्यूल निर्माता वाली एनर्जीजचा IPO 21 ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला होता. हा 23 ऑक्टोबरला बंद झाला.
Waree Energies IPO ला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि एकूण 79.44 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. हा IPO किरकोळ श्रेणीत 11.27 पट सबस्क्राइब झाला. QIB मध्ये 215.03 वेळा आणि NII श्रेणीमध्ये 65.25 वेळा बुकिंग करण्यात आली. त्यातच TATA-Bajaj ला मागे टाकत एनर्जी कंपनीच्या IPO ने सर्व रेकॉर्ड मोडल्याचे पाहिला मिळाले.