मुंबई : सध्या शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असतानाच अशी एक सरकारी कंपनी आहे त्याच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला असून, त्यांची चांदीच झाली आहे. कारण, यातून अवघ्या दोन महिन्यांत गुंतवलेले पैसे दुप्पट झाले आहेत.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) असे या सरकारी कंपनीचे नाव असून, मागील दोन महिन्यात ज्यांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना दुप्पट परतावा मिळाला आहे. शुक्रवारी शेअर बाजार कोसळला. पण एमटीएनएलचे शेअर्स गेल्या 5 दिवसांत 63 टक्क्यांनी वाढले आहेत. टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 19.37 रुपये आहे. जुलैमध्ये आतापर्यंत एमटीएनएलचे शेअर्स 68 टक्क्यांनी वाढले आहेत.
1 जुलै 2024 रोजी टेलिकॉम एमटीएनएलचे शेअर्स 41.45 रुपयांवर होते. 19 जुलै 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 70.42 रुपयांवर पोहोचले आहेत. महानगर टेलिकॉम निगम लिमिटेडचे बाजार भांडवल सुमारे 4367 कोटी रुपये इतके आहे. एमटीएनएलचे शेअर 13 मे 2024 रोजी 33.50 रुपयांवर होते. जे चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 19 जुलै 2024 रोजी 70.42 रुपयांवर पोहोचलेले पाहायला मिळाले.