पुणे : सोने-चांदीच्या दरात कधी घसरण तर कधी तेजी पाहिला मिळते. पण आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी खरेदीला चांगली पसंती दिसत आहे. विक्रीही चांगली होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 71,680 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत थोड्याशा फरकाने कमी-जास्त होताना दिसत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 66,340 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 90,500 रुपयांवर गेले आहेत. सोने-चांदीचे दर कमी असो वा जास्त त्याची खरेदी करणारा एक विशेष असा वर्ग आहे. सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवावी लागते.
त्यातच भाव जरी कमी किंवा जास्त होत असले तरीही ते खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.