नवी दिल्ली : पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेने आपल्या बँकेच्या खातेदारांसाठी एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये खातेदारांना KYC डिटेल्स अपडेट करण्यास सांगितले आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएनबीच्या नवीन अधिसूचनेमध्ये 31 मार्चपर्यंत KYC अपडेट करण्यास सांगितले आहे.
पंजाब नॅशनल बँकने KYC अपडेटसाठी आयडी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, सध्याचा फोटो, पॅनच्या मदतीने ते अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नवीन अधिसूचनेनुसार, उत्पन्नाच्या पुराव्यासाठी, फॉर्म 60 आणि मोबाईल नंबर देखील अपडेट करावा लागणार आहे. हे काम पीएनबी वन आणि इंटरनेट बँकिंग सर्व्हिस (आयबीएस) च्या मदतीने देखील पूर्ण केले जाऊ शकते. नोंदणीकृत ई-मेल किंवा बँकेच्या शाखेच्या मदतीने केवायसी डिटेल्स देखील पूर्ण करता येऊ शकतात. त्यात खातेदारांना माहिती अपडेट करावी लागणार आहे.
PNB One वरून असं करा अपडेट…
– Google Play Store किंवा Apple App Store वरून PNB One ॲप डाउनलोड करा.
– तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
– ॲपमधील केवायसी अपडेट सेक्शनमध्ये जा.
– तुमचे केवायसी अपडेट प्रलंबित आहे की नाही ते तपासा.
– केवायसी अपडेट पेंडिंग दिसत असल्यास, ‘अपडेट केवायसी’वर क्लिक करा.
– OTP-आधारित आधार ओळखपत्राद्वारे तुमची ओळख अॅग्री करा. तुमच्या आधारशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी एंटर करा.
– ओटीपी पडताळणीसाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असल्याची खात्री करा.
– अधिक माहितीसाठी खातेदार त्यांच्या जवळच्या PNB शाखेला भेट देऊ शकतात किंवा अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ वर माहिती मिळवू शकतात.