मुंबई: कर्ज मिळवण्यासाठी सिबील स्कोअर असणे खूप महत्त्वाचे असते. सिबील स्कोअर चांगला असल्यास कर्ज मिळवण्यात अडचण येत नाही. भारतीय रिझर्व्ह बैंक (आरबीआय) ने याबाबतच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांचा सिबील स्कोअर प्रत्येक १५ दिवसांनंतर अपडेट केला जाणार आहे. हा नवीन नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू केला जाणार आहे.
वित्तीय संस्थांनी लवकरात लवकर क्रेडिट स्कोअर अपडेट करावा, असे आरबीआयने म्हटले आहे. सिबील स्कोअर हा दर महिन्याच्या १५ तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या त्यांच्या इच्छेनुसार देखील तारखा निश्चित करू शकतात. ज्याअंतर्गत डेटा अपडेट केला जाऊ शकतो.
क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे. दरम्यान, या निर्णयाचा बँक आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे. बँक आणि एनबीएफसी या दोन्हींसाठी देखील क्रेडिट माहिती खूप महत्त्वाची आहे. याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकणार आहेत.