नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष 2024-25 साठी सामान्य अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेतकरी आणि तरुणांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सामान्य अर्थसंकल्प हा अमृतकालचा महत्त्वाचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. ते पाच वर्षांसाठी आपली दिशा ठरवेल आणि 2047 पर्यंत विकसित भारताची पायाभरणी करेल.
यावेळी अर्थमंत्र्यानी एक मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, रोजगार आणि कौशल्य विकास हे सरकारच्या नऊ प्राधान्यांपैकी एक आहे. या अंतर्गत प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. औपचारिक क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी सुरू करणाऱ्यांना एक महिन्याचा पगार दिला जाईल. हा पगार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल. त्याची कमाल रक्कम 15 हजार रुपये असेल. EPFO मध्ये नोंदणी केलेल्या लोकांना ही मदत मिळेल. पात्रता मर्यादा 1 लाख रुपये प्रति महिना असेल. याचा फायदा 2.10 कोटी तरुणांना होणार आहे. सरकार 30 लाख तरुणांना रोजगार देणार आहे. हा लाभ भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफमध्ये एका महिन्याच्या योगदानाच्या स्वरूपात असेल.