नवी दिल्ली : तुम्ही देखील बँकांकडून कर्ज घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. कारण, देशातील आघाडीच्या पाच बँकांनी जुलै महिन्यात कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. याचा आर्थिक भुर्दंड कर्ज घेणाऱ्या खातेदारांना सहन करावा लागणार आहे. या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, कॅनरा बँकेसह इतर काही बँकांचा समावेश आहे.
कॅनरा बँकेचा ओव्हरनाईट दर 8.20 टक्के आहे. एका महिन्याचा दर 8.30 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 8.40 टक्के आहे. सहा महिन्यांचा दर 8.75 टक्के आहे. एक वर्षाचा दर 8.95 टक्के आहे. दोन वर्षांचा दर 9.25 टक्के आहे. तीन वर्षांचा दर 9.35 टक्के आहे. तर पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ओव्हरनाईट दर 8.25 टक्के आहे. एका महिन्यासाठी एमसीएलआर आधारित कर्जाचा दर 8.30 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 8.50 टक्के आहे.
याशिवाय, देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने ओव्हरनाईट कालावधीसाठी कर्जाचा दर 8.95 टक्क्यांवरून 9.05 टक्क्यांपर्यंत 10 बीपीएसने कमी केला आहे. एका महिन्यासाठी तो 9 टक्क्यांवरून 9.10 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बँकेने व्याज दर 9.15 टक्क्यांवरून 9.20 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
येस बँकेच्या व्याजदरातही वाढ झाली आहे. बँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ओव्हरनाईट दर 9.10 टक्के आहे. एका महिन्यासाठी एमसीएलआर आधारित कर्ज दर 9.45 टक्के आहे. तीन महिन्यांचा दर 10.10 टक्के आहे. तर सहा महिन्यांचा दर 10.35 टक्के आहे. एक वर्षाचा दर 10.50 टक्के आहे.