नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात राजधानी दिल्लीत सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर राहिला. मंगळवारी मागील सत्रात 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे दर 1,400 रुपयांनी वाढून 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले आहे.
‘ऑल इंडिया बुलियन असोसिएशन’नुसार, चार दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी चांदीच्या दरात पुन्हा घट झाल्याचे पाहिला मिळाले. मंगळवारी मागील सत्रात 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 150 रुपयांनी घट होऊन हा दर 87,000 रुपये प्रति किलो झाला आहे. हा दर मागील सत्रात 87,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 71,980 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने वाढल्याचे दिसत आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 66,640 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 86,500 रुपयांवर गेले आहेत.