मुंबई : शेअर बाजारात गुंतणवूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात कंपन्यांकडून चांगला परतावा दिला जात आहे. असे असताना मंगळवारी (दि.6) बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. त्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसले. सेन्सेक्स 177 घसरून 78,593 च्या जवळ बंद झाला.
बँक निफ्टी 300 हून अधिक अंकांनी घसरला. तेजीच्या सुरुवातीनंतर बाजारात नफा बुकिंग दिसून आला. त्यानंतर निफ्टी सुमारे 375 अंकांनी घसरला आणि 24,000 च्या जवळ बंद झाला. घसरलेल्या शेअर्समध्ये मॅरिको 6.49 टक्के, एलआयसी हाऊसिंग फायनान्स 5 टक्के, पॉवर फायनान्स 4.82 टक्के, एचडीएफसी लाईफ 4.40 टक्के, बाटा इंडिया 2.70 टक्क्यांनी घसरले.
व्यवहारातील वाढत्या शेअर्समध्ये गोदरेज प्रॉपर्टीज 3.49 टक्क्यांच्या वाढीसह, ब्रिटानिया 2.81 टक्क्यांच्या वाढीसह, इप्का लॅब 2.69 टक्क्यांच्या वाढीसह, IGL 1.40 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक देखील वरपासून सुमारे 950 अंकांनी घसरला आणि 49800 च्या जवळ बंद झाला.