मुंबई : भारतीय शेअर बाजारात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. पण आता मे महिन्याच्या अखेरीस सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी पाहिला मिळाली. मागील तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत आर्थिक वाढ मंद राहण्याची अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही उसळी पाहिला मिळत आहे. अपोलो हॉस्पिटलचे शेअर्स 3 टक्क्यांनी वाढले. तर झोमॅटोच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घट झाली. देशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या (दि.1) मतदान होणार आहे. तत्पूर्वी, शेअर बाजारात मोठा चढउतार होत आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत आर्थिक वाढ मंद राहण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भारताच्या चौथ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारीही जाहीर केली जाणार आहे. त्यावरही आता बाजाराची नजर असणार आहे. यातच आठवड्याच्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वधारला आहे.