पुणे : आज 1 ऑक्टोबर नवा महिना सुरु झाला आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून इंधन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.
IOCL च्या संकेतस्थळानुसार, 19 किलोच्या गॅस सिलिंडरची नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता व्यावसायिक सिलेंडर 1740 रुपयांना मिळणार आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
जुलै 2024 पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. 1 जुलै 2024 रोजी तेल कंपन्यांनी LPG किमतीत कपातीची भेट दिली होती. मात्र ऑगस्ट 2024 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 8.50 रुपयांनी महागला. त्यानंतर सप्टेंबरला महिन्यातही सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला.
मुंबईत 19 किलोचा गॅसची किंमत सप्टेंबर महिन्यात 1605 रुपयांनी वाढवून 1644 रुपयांवर पोहचली. त्यात आता पु्न्हा एकदा वाढ झाली. आता देशाच्या आर्थिक राजधानीत आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1692.50 रुपये आहे. याशिवाय कोलकत्ता शहरात सप्टेंबर महिन्यात गॅस सिलिंडरची किंमत 1802.50 रुपये होते. आता ही किंमत 1850.50 रुपये आहे. चेन्नई शहरात सिलिंडरची किंमत 1903 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 1855 रुपये होती. दिल्लीत या किंमती 1740 रुपयांवर पोहचल्या आहेत