मुंबई : शिक्षण क्षेत्रातील कंपनी बायजूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) बंगळुरूमध्ये edtech फर्म BYJUS विरुद्ध दिवाळखोरीचा खटला मागे घेण्यासाठी याचिका दाखल केली आहे आणि त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाचा (एनसीएलएटी) निर्णय ऑक्टोबरमध्ये रद्द केला होता. ज्यामुळे एड-टेक फर्म बायजू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील 158 कोटी रुपयांच्या करारास मान्यता दिली होती. त्यामुळे बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडवर दिवाळखोरीच्या कारवाईचे संकट पुन्हा सुरू झाले होते.
जुलैमध्ये, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने कंपनीविरुद्ध दिवाळखोरी कारवाईसाठी याचिका स्वीकारली होती. BYJU आणि BCCI यांच्यात 31 जुलै रोजी करार करण्यात आला होता. Byju’s-BCCI मध्ये एक करार झाला होता, जो राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने (NCLAT) स्वीकारला होता. टीम इंडियाच्या जर्सीसाठी 2019 मध्ये थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड आणि BCCI यांच्यात प्रायोजकत्व करार करण्यात आला होता.