पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षांतील सुट्यांची एक यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार जून महिन्यात बँका बंद राहणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 तारखेला काही राज्यात लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. त्या भागात बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे सामान्य नागरिकांनी बँकेशी संबंधित कामांचे आताच नियोजन करणे गरजेचे आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, जून महिन्यात सुट्टीच्या दिवशी कोणतेही कामकाज होणार नाही. म्हणजेच उरलेल्या दिवसांतच तुम्हाला तुमचे बँकेचे काम करावे लागेल. या सुट्ट्यामध्ये राष्ट्रीय, क्षेत्रीय सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्यांचा समावेश आहे.
बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते ड्राफ्ट काढण्यापर्यंत सर्व कामांसाठी बँकेत जावे लागते. अशातच वर्षाचा सहावा महिना सुरु होण्यापूर्वी बँक एकूण किती दिवस बंद राहणार आहेत, हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे.
जून 2024 मध्ये ‘या’ दिवशी बंद असणार बँक
– 2 जून 2024 – रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
– 8 जून 2024 – दुसऱ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
– 9 जून 2024 – रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
– 15 जून 2024- शनिवार भुवनेश्वर आणि आयझॉल झोनमध्ये YMA दिवस किंवा राजा संक्रांतीमुळे बँका बंद
राहतील.
– 16 जून 2024 – रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
– 17 जून 2024 – सोमवार बकरी ईदमुळे बँका जवळपास बंद राहतील.
– 21 जून 2024 – शुक्रवार वटसावित्री पौर्णिमेमुळे बँकांमध्ये कामकाज नाही
– 22 जून 2024 – (चौथा शनिवार) चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.
– 23 जून 2024 – रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
– 30 जून 2024 – रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.