मुंबई : सर्वसामान्यांपासून ते अगदी उच्चभ्रूपर्यंत सर्वांचेच बँकांमध्ये काहीना काही कारणास्तव काम हे येतेच. तुमचं देखील सारखंच बँकांमध्ये काम असेल तर तुमची कामे लवकर आटोपून घ्या. कारण, आता ऑगस्ट महिन्यात विविध कारणांमुळे बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या असणार आहेत.
रक्षाबंधन, जन्माष्टमी यांसारख्या मोठ्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात बँकांना सुट्ट्या मिळणार आहेत. ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने जवळपास बँकांना 13 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँकांचे केवळ अर्धाच महिना कामकाज होऊ शकणार आहे.
बँकांशी संबंधित कामे लवकर करा
ऑगस्टमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे सहा दिवस सुट्या आहेत. तर देशातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या सणांमुळे बँका सात दिवस बंद राहणार आहेत.
कधी-कधी असणार सुट्ट्या…
3 ऑगस्ट – केर पूजा (आगरतळा)
4 ऑगस्ट – रविवार (देशभरात)
8 ऑगस्ट – तेंदोंग लो रमफात (गंगटोक)
10 ऑगस्ट – दुसरा शनिवार (देशभरात)
11 ऑगस्ट – रविवार (देशभरात)
13 ऑगस्ट – देशभक्त दिवस (इम्फाळ)
15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन (देशभरात)
18 ऑगस्ट – रविवार (देशभरात)
19 ऑगस्ट – रक्षाबंधन (अहमदाबाद, जयपुर, कानपुर, लखनऊ आणि अन्य ठिकाणी)
20 ऑगस्ट – श्री नारायण गुरु जयंती (कोच्चि, तिरुवनंतपुरम)
24-25 ऑगस्ट – चौथा शनिवार-रविवार (देशभरात)
26 ऑगस्ट – जन्माष्टमी (देशभरात).