नवी दिल्ली : ऑटोमोबाईल कंपन्या देशात दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढील काही वर्षांमध्ये ही गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. या गुंतवणुकीचा रोडमॅपही तयार केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार मॉडेल्सची विक्री करणारी कंपनी मार्च 2026 पर्यंत आणखी सहा मॉडेल्स बाजारात आणण्याचे उद्दिष्ट आहे.
मारुती सुझुकी इंडिया, धुंदाई मोटर इंडिया, जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया, निसान मोटर कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रेनॉल्ट एसए यांसारख्या ऑटो कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वाहनांच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. वाहन निर्मात्यांनी भविष्यातील तंत्रज्ञानातील व्हॉल्यूम आणि गुंतवणुकीवर लक्ष ठेवून त्यांनी पुढील काही वर्षांमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा रोडमॅप तयार केला आहे.
गेल्या आठवड्यात भारतातील इलेक्ट्रिक वाहन लीडर टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष 2030 पर्यंत त्यांच्या ईव्ही युनिटमध्ये 16 ते 18,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना आखत असल्याचे सांगितले.