मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. कारण, यातून चांगला परतावाही मिळत आहे. त्यात तुम्हीही IPO च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते.
आता इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक आणि फार्मास्युटिकल कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्स यांना बाजार नियामक SEBI कडून वित्त उभारण्यासाठी IPO लाँच करण्याची मंजुरी मिळाली आहे. सेबीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांच्या आयपीओशी संबंधित मसुदा कागदपत्रांना 10 जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार, आता या कंपन्या आपला IPO आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.
5500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्याची योजना आहे. आता दोन्ही कंपन्या त्यांचे संबंधित IPO लाँच करण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या प्रस्तावित IPO मध्ये, 5,500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांकडे असलेले 9.52 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ऑफर केले जातील, अशीही माहिती देण्यात आली आहे.