नवी दिल्ली: अलीकडेच कृषी तज्ज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व चर्चेत भेट घेतली. त्यांनी अर्थमंत्र्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम-किसान हप्त्याची रक्कम सध्याच्या 6,000 रुपयांवरून वार्षिक 8,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. अर्थसंकल्प 2024 मध्ये त्यांनी थेट लाभ हस्तांतरण (DBT) आणि कृषी संशोधनासाठी अतिरिक्त निधीद्वारे थेट शेतकऱ्यांना सर्व अनुदान देण्याची मागणी केली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?
पीएम किसान योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, त्यासोबत काही अटीही ठेवण्यात आल्या होत्या. देशभरातील पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात.
देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला निर्णय पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा 17 वा हप्ता जाहीर करण्याचा होता. या हप्त्याचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. यामध्ये अंदाजे 20,000 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
पात्र शेतकरी नोंदणी कशी करू शकतात?
स्टेप 1: pmkisan.gov.in वर जा
स्टेप 2: फार्मर्स कॉर्नर पर्यायावर क्लिक करा
स्टेप 3: नवीन शेतकरी नोंदणी पर्यायावर क्लिक करा
स्टेप 4: ग्रामीण शेतकरी नोंदणी किंवा शहरी शेतकरी नोंदणी निवडा
स्टेप 5: आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा, राज्य निवडा आणि गेट ओटीपीवर क्लिक करा.
स्टेप 6: ओटीपी भरा आणि नोंदणीसाठी पुढे जा
स्टेप 7: राज्य, जिल्हा, बँक तपशील आणि वैयक्तिक तपशील यांसारखे अधिक तपशील प्रविष्ट करा. आधारनुसार तुमचा तपशील प्रविष्ट करा.
स्टेप 8: ‘सबमिट फॉर आधार ऑथेंटिकेशन’ वर क्लिक करा
स्टेप 9: एकदा आधार ऑथेंटिकेशन यशस्वी झाले की, तुमच्या जमिनीचे तपशील एंटर करा, तुमची कागदपत्रे अपलोड करा आणि सेव्ह वर क्लिक करा.
स्टेप 10: तुमच्या स्क्रीनवर कन्फर्मेशन या रिजेक्शनचा मेसेज दिसेल.