मुंबई : ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ अर्थात ADB ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकासदराचा अंदाज 7 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. चांगले कृषी उत्पादन आणि उच्च सरकारी खर्चाच्या पार्श्वभूमीवर येत्या तिमाहीत अर्थव्यवस्था वेगवान होईल, असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (2023-24) भारतीय अर्थव्यवस्था 8.2 टक्क्यांनी वाढली आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात 7.2 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात म्हटले की, आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) जीडीपी वाढ 6.7 टक्क्यांवर घसरली आहे. मात्र, कृषी क्षेत्रातील सुधारणा आणि उद्योग यांमुळे येत्या तिमाहीत वाढ होईल, असा देखील अंदाज आहे.
‘एशियन डेव्हलपमेंट आउटलुक’मध्ये ADB ने सांगितले की, ‘सेवा निर्यातीत वाढ झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात निर्यात पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त असेल. ADB च्या मते, पुढील आर्थिक वर्षात मालाची निर्यात वाढ तुलनेने मंद राहील. आर्थिक वर्ष 2024 मध्ये सात टक्के जीडीपी वाढ असेल, असेही म्हटले जात आहे.