मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने उद्योग क्षेत्रात चांगली आघाडी घेतली आहे. त्यात आता अदानी समूहाने आणखी एक सिमेंट कंपनी खरेदी केली आहे. त्यामुळे आता अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटकडे आणखी एक सिमेंट कंपनी आली आहे.
अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचे 10,422 कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण करण्याची घोषणा केली. पेन्ना सिमेंटच्या अधिग्रहणामुळे अदानी समूहाची सिमेंट उत्पादन क्षमता दरवर्षी 14 दशलक्ष टन वाढेल. यामुळे अदानी समूहाची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता प्रतिवर्षी 89 दशलक्ष टनांवर पोहोचेल. या अधिग्रहणासाठी दोन्ही कंपन्यांनी करार केला आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट पी. प्रताप रेड्डी कुटुंबाकडून 100 टक्के शेअर्स खरेदी करणार आहे
पेन्ना सिमेंटची स्थापना 24 ऑक्टोबर 1991 रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे झाली. कंपनी सिमेंट उत्पादनाच्या व्यवसायात आहे. पेन्ना सिमेंटचे भारत आणि श्रीलंकेत त्याच्या उपकंपन्यांद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ऑपरेशन्स आहेत. आता या कंपनीचा अधिग्रहण पूर्ण होण्याचा अंदाजे कालावधी 3-4 महिने आहे.