नवी दिल्ली : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये आहेत. अदानी समूहासाठी शेअर मार्केटमध्ये ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे. कारण आता अदानी समूहाच्या रेटिंगमध्ये सुधारणा होत आहे. ही गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे.
जागतिक मानांकन संस्था ‘मूडीज इन्व्हेस्टर्स ग्रुप’ने याबाबत माहिती दिली. त्यात अदानी समूहाच्या चार कंपन्यांचा कर्जाचा दृष्टीकोन ‘निगेटिव्ह’वरून ‘स्टेबल’ असा बदलला आहे. या बदलत्या रेटिंगचा फायदा कंपनीला होणार असून, गुंतवणूकदारांचा कल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीने सर्व 8 कंपन्यांच्या रेटिंगला पुन्हा दुजोरा दिला आहे. त्यात अदानी इलेक्ट्रसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल), अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल), अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड ग्रुप (एजीईएल आरजी-1), अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन लिमिटेड (एटीएसओएल) यांचा समावेश आहे.
अदानी ग्रुपच्या ज्या कंपन्यांचे रेटिंग आउटलुक बदलले नाही, त्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड ग्रुप यांचा समावेश आहे. मूडीजने अदानी समूहाच्या काही कंपन्यांचे रेटिंग कमी केले होते. आता चार कंपन्यांचे रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे.