मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. कारण, यातून चांगला परतावा मिळत आहे. असे असताना एक शेअर असा होता, त्याची वर्षभरापूर्वी किंमत पाच रुपये होती. पण आता हा शेअर 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. या शेअरचे नाव आहे आयुष वेलनेस लिमिटेड.
आयुष वेलनेस लिमिटेडचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत फक्त 4.65 रुपये होती, पण आता ती 203.20 वर पोहोचली आहे. अशा प्रकारे, या स्टॉकने एका वर्षात सुमारे 4270 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असतील तर आज ही रक्कम सुमारे 44 लाखांमध्ये बदलली असेल. एकेकाळी हा शेअर पेनी स्टॉकमध्ये गणला जायचा, म्हणजे त्याची किंमत खूपच कमी होती. अशा पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक आहे.
पेनी स्टॉकमध्ये अनेकदा कमी व्हॉल्यूम आणि उच्च किंमत अस्थिरता असते. पण आज आयुष वेलनेस लिमिटेड हा मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने अपर सर्किट होत आहे. शुक्रवारी 2 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला लागला आणि शेअर 203.20 वर बंद झाला.