नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण, यातून कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो. पण यासाठी योग्य आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे असते. त्यात असा एक शेअर आहे जो 38 रुपयांना होतो तो आता 800 रुपयांच्या जवळ येऊन पोहोचला आहे.
जिंदाल स्टेनलेस असे या स्टॉकचे नाव आहे. ज्याने केवळ पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अवघ्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक बनलेल्या जिंदाल स्टेनलेसचे शेअर्स आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सुमारे 2 टक्के वाढीसह 797 रुपयांवर पोहोचले आहेत. तो मागील बंदच्या तुलनेत वाढीसह 779.55 रुपयांवर उघडला.
गेल्या पाच वर्षात या स्टॉकने 2057 टक्के परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 26 सप्टेंबर 2019 रोजी जिंदाल स्टेनलेस लिमिटेडच्या एका शेअरची किंमत फक्त 38 रुपये होती, जी आता 797 रुपयांवर पोहोचली आहे. त्यानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या धातूच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आतापर्यंत ठेवले असेल तर त्याची रक्कम आता 21,57,000 रुपये झाली असेल.