मुंबई : दोन हजार रुपयांच्या ९८ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. चलनातून काढून टाकण्यात आलेल्या ७,११७ कोटी रुपयांच्या नोटा आता लोकांकडे असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. १९ मे २०२३ पर्यंत, त्यावेळी चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते.
३० सप्टेंबर २०२४ रोजी ते ७,११७ कोटी रुपयांवर घसरले. अशाप्रकारे, १९ मे २०२३ रोजी चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या नोटांपैकी ९८ टक्के नोटा परत आल्या आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये २,००० रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती.